गोष्ट पैश्याची

१० हजाराचे झाले १ कोटी; ‘या’ कंपनीच्या शेअरने केले मालामाल

रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम आताच्या घडीला शेअर मार्केटवर होताना पाहायला मिळत आहे.

यामुळे अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले असून, गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असताना मात्र दुसरीकडे अशातच TATA ग्रुपच्या एका कंपनीने कमाल कामगिरी करत तेजी कायम राखली आहे.

TATA ग्रुपमधील या कंपनीचे नाव आहे Titan. टायटन कंपनीचा शेअर एनएसईवर आपल्या ऑल टाईम हाय लेव्हल म्हणजेच २,६८७.२५ रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.

एखाद्या गुंतवणूकदारांना २० वर्षांपूर्वी या कंपनीत केवळ १० हजार रुपये गुंतवले असते, तर आता त्याला १ कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळाला असता. एखाद्या गुंतवणूकदाराने याच कालावधीत १ लाख रुपये गुंतवले असते, तर याचीच किंमत आता ११ कोटींच्या घरात पोहोचली असती, असे सांगितले जात आहे.

Titan ने गेल्या २० वर्षांच्या कालावधीत तब्बल १ हजार टक्क्यांचा परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे, असे सांगितले जात आहे.

टायटन कंपनीचा मार्केट कॅप आताच्या घडीला सव्वा दोन लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. टायटन कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली, तेव्हा त्याच्या शेअरची किंमत २.३५ रुपये होती.

Titan कंपनीचा शेअर १० वर्षांपूर्वी १७८ रुपयांवर होता. आता तोच शेअर २,६८७ रुपयांवर गेला आहे. दरम्यान, Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे टायटन कंपनीचे ४५,२५०,९७० शेअर्स आहेत.

याशिवाय त्यांच्या पत्नीचीही मोठी गुंतवणूक टाटाच्या टायटनमध्ये आहे. TATA ग्रुपमधील वातानुकूलित उत्पादने तयार करणाऱ्या Voltas या कंपनीची शेअर मार्केटमध्ये दमदार कामगिरी सुरू आहे.

व्होल्टाज कंपनीचा शेअर ४ रुपयांवरून थेट १२०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २२ वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर एनएसईवर ४ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button