Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरपुणे, पिंपरीसह जिल्ह्यात मराठा सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण

पुणे, पिंपरीसह जिल्ह्यात मराठा सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण

Ahmednagar News : शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी रात्री उशीरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तालयाकडून पुणे जिल्ह्याचा अहवाल महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला आज (शनिवारी) देण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने शेवटच्या दिवशी (दि.२) सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. सर्वेक्षणाच्या कालावधीत साडेतेरा लाख घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणाला सुरूवात झाल्यानंतर गुरुवारपर्यंत (दि.१) साडेअकरा लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानुसार गुरुवारपर्यंत ९७ टक्के सर्वेक्षण झाले होते.

शुक्रवारी उर्वरित दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे सर्वेक्षण १०० टक्के झाल्याचा दावा समन्वय अधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी केला.

शहरात सर्वेक्षणासाठी महापालिकेने एकूण ३००७ प्रगणकांची नियुक्ती केली होती. गेल्या आठवड्यापासून शहरात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सुमारे सहा हजार प्रगणकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मिळून दहा लाख ८१ हजार ७९५ घरांचे सर्वेक्षण करायचे होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचा दावा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments