10th Pass Government Jobs : 10वी पास तरुणांना मोठी संधी ! आता तुम्हाला मिळेल सरकारी नोकरी; फक्त करा हे काम
10वी नंतर, केंद्र सरकारच्या विभागांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न आहे, त्यामुळे येथे भरती कशी केली जाते आणि कोण त्यात सामील होऊ शकते हे जाणून घ्या.

10th Pass Government Jobs : तरुण मुलांचे स्वप्न असते की एक चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. मात्र यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. अशा वेळी सरकारी नोकरी ही देशात सर्वात जास्त सुरक्षित मानली जाते.
देशात मोठ्या प्रमाणात तरुण सरकारी नोकरीसाठी धरपड करत असतात. अशा वेळी जर तुम्हीही सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे.
कारण 10वी नंतर, केंद्र सरकारच्या विभागांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेकांचे असते त्यामुळे येथे भरती कशी केली जाते आणि कोण त्यात सामील होऊ शकते हे तुम्ही जाणून घ्या.
दरम्यान, 10वी पाससाठी केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ग्रुप सी पदांवर भरती केली जाते. ज्याद्वारे मल्टी टास्किंग स्टाफची पदे भरली जातात. यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन, एस.एस.सी.तर्फे परीक्षा आयोजित केली जाते. या पदांच्या भरतीसाठी दरवर्षी एसएससी एमटीएस परीक्षा घेतली जाते.
कोण परीक्षा देऊ शकतो
SSC MTS अधिसूचनेनुसार, विहित कट ऑफ तारखेनुसार 10 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीमध्ये सामील होऊ शकतात. तसेच, उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. तथापि, काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.
परीक्षेचा पॅटर्न
MTS पदांसाठी, एसएससी MTS भरती परीक्षेअंतर्गत संगणक आधारित परीक्षा आहे. या परीक्षेत न्यूमेरिकल एंड मैथमेटिकल एबिलिटी, रीजनिंग एबिलिटी, जनरल अवेयरनेस आणि इंग्रजीमधून प्रश्न विचारले जातात.
यामध्ये चारही विषयांची 2 विभागात विभागणी केली आहे. प्रत्येक विभागासाठी दिलेला वेळ 45 मिनिटे आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते.
अधिसूचना जाणून घ्या
एसएससी एमटीएस भरती परीक्षेची अधिसूचना या वर्षीही लवकरच जारी केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुलैच्या सुरुवातीला अधिसूचना जारी केली जाऊ शकते. त्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतील. याशिवाय, भरतीची संपूर्ण माहितीही अधिसूचनेवर उपलब्ध असेल.