अहमदनगर

जमीन व्यवहरात व्यावसायिकाला 11 लाखाला चुना

अहमदनगर- ओळखीच्या व्यक्तीला दोघांनी 11 लाख रूपयामध्ये चक्क सहा एकर जमीन देण्याचे आमिष दाखविले. जमीन खरेदी तर दिलीच नाही; पण दिलेले 11 लाख रूपयेही दिले नाही.

 

नगर शहरातील सावेडी उपनगरात राहणारे व्यावसायिक प्रवीण रमेशचंद्र अजमेरा (वय 54) यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज केल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात शेख अख्तर उस्मान व कृष्णा शिंदे पाटील (दोघे रा. औरंगाबाद) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 

अजमेरा यांची कृष्णा शिंदे पाटील सोबत ओळख होती. शिंदे व शेख यांनी अजमेरा यांना सय्यदपुरा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील सहा एकर जमीन 11 लाख रूपये किंमतीमध्ये देण्याचे आमिष दाखविले. अजमेरा यांनी ती जमीन घेण्याचा निर्णय घेत शेख यांना आरटीजीएसद्वारे 11 लाख रूपये दिले. एक महिन्यात जमिनीचा व्यवहार करून देतो, अशी नोटरी करून दिली होती.

 

दरम्यान शेख व शिंदे यांनी एक महिन्यात जमिनीचा व्यवहार करून न देता अजमेरा यांचे 11 लाख रूपयेही दिले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button