अहमदनगर
नगर जिल्ह्यातील आमदारांना 14 कोटींची ‘लॉटरी’

मतदारसंघातील विकास कामासाठी दिला जाणारा स्थानिक विकास निधी चार कोटीवरून पाच कोटी रुपये करण्याची घोषणा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी आमदाराना होळीची विशेष भेट दिली.
याशिवाय आमदारांचे पीए आणि वाहनचालक यांच्या वेतनात पाच हजार रुपयांची घसघशीत वाढ करण्यात येत असल्याचे पवार यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सर्वपक्षीय खुश आमदार झाले आहेत.
यात नगर जिल्ह्यात 12 विधानसभा सदस्य, तर विधापरिषदेचे दोन असे एकूण 14 सदस्य आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांच्या आमदारांसाठीच्या विकासनिधीत प्रत्येकी 1 कोटींची वाढ करण्याच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्याला आता 14 कोटींचा अतिरिक्त विकास निधी मिळणार आहे.