अहमदनगर

155 आरोपी आले शरण; ‘हे’ आहे कारण

अहमदनगर- विविध गुन्ह्यातील पसार व पाहिजे असलेले 155 आरोपींनी शरणागती मेळाव्यात कायद्यासमोर शरणागती पत्करली आहे. यामध्ये खूनाचा प्रयत्न 6, दरोडा 6, जबरी चोरी 4, घरफोडी 1, चोरी 5, अत्याचार 2, विनयभंग 11, गंभीर दुखापत 10, फसवणूक 3, इतर 107 आरोपींचा सहभाग आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून येथील पेमराज सारडा महाविद्यालयात शरणागती मेळावा पार पडला. यावेळी महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील, अधीक्षक पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, साहित्यिक नामदेव भोसले, राजेंद्र काळे, शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते.

गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी पसार झाले होते. अशा आरोपींनी तपासकामी पोलिसांसमोर हजर झाल्यास कायद्याचे चौकटीमध्ये राहुन गुन्ह्याची सत्यता पडताळून किंवा किरकोळ स्वरूपाचे गुन्हे तडजोडपात्र असल्यास न्यायालयाचे आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button