अहमदनगर

पहिल्या दिवशी १८०० एसटी रस्त्यावर !

राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आळा बसावा यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल करण्यात आला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनलॉकच्या पहिल्याच दिवशी १८०० एसटी रस्त्यावर धावल्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बे्रक द चेननुसार लॉकडाऊन ७ जूनपासून शिथिल करण्यात आला. त्यामुळे काही महिन्यांपासून बंद असणारी एसटीची सेवा पूर्णक्षमतेने राज्यभरात सुरू करण्यात आली.मुंबईत लोकल, बेस्ट बस, मेट्रो, मोनो ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आहेत.

मात्र ग्रामीण भागात राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीशिवाय अन्य पर्याय नाही. दोन महिन्यांपासून ठप्प असलेली एसटी सेवा सुरू झाल्याने ग्रामीण जनतेला तसेच मुंबईतून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या जनतेलाही दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाच्या सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन एसटीकडून होत आहे. सर्वसामान्यांसाठी एसटी सेवा सुरू झाली असली तरीही वर्षभरात अत्यावश्यक सेवेसाठी एसटी कर्मचारी कर्तव्यावर होते.

यादरम्यान एसटीची वाहतूक पूर्णत: बंद असल्याने एसटीची आर्थिक घडी विस्कटली आहे. प्रवासी संख्येचा ओघ वाढल्यावर आर्थिक घडी बसेल, असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोरोना काळात ६००हून अधिक कर्मचारी कोरोनामुळे मृत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button