अहमदनगर

भरधाव डंपरखाली चिरडून 19 मेंढ्यांचा मृत्यू; 25 जायबंदी

अहमदनगर – भरधाव वेगाणे जाणार्‍या डंपरखाली चिरडुन 19 मेंढ्यांचा मृत्यु झाला तर 25 मेंढ्या जायबंदी झाल्या आहेत. अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर पोखर्डी (ता. नगर) गावाजवळ आज दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात डंपर चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्याचे काम चालु आहे.

डंपरच्या चालकाचा डंपरवरील ताबा सुटुन डंपर रस्ता दुभाजकावर चढला त्याने मेंढ्यांच्या कळपाला चिरडले. रस्ताभर मेंढ्याच्या मांसाचा खच पडलेला होता.

या घटनेमुळे नगर- औरंगाबाद महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. त्यावेळी स्थानिकांनी वाहतुक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मदत केली.

  • मेंढ्यांचे कळप हे पुरंदर तालुक्यातील रहिवासी असून ते मेंढ्यांच्या कळपासह नाशिकला मेंढ्या चरायला गेले होते. येतांना ते मनमाड-औरंगाबाद रस्त्याने नगर मार्गे पुण्याकडे चालले होते. मात्र नगर औरंगाबाद रस्त्यावर त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. या अपघातामुळे या धनगर मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button