अहमदनगर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 19 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी सरफराज इकबाल शेख (वय 19 रा. बोरावकेनगर, दौंड, जि. पुणे) यास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

तर याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी अरबाज भैय्या खान याला एक वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. श्रीगोंदा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. एस. शेख यांनी हा निकाल दिला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जानेवारी 2021 मध्ये अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना अरबाज खान हा सरफराज शेख याला घेऊन आला होता. सरफराज हा मुलीस म्हणाला,‘तु मला फार आवडते, माझ्या सोबत प्रेम कर’, असे म्हणाला असता मुलीने त्यास नकार दिला.

त्यावर अरबाज मुलीला म्हणाला,‘तु जर सरफराज सोबत प्रेम केले नाही तर मी तुझे आई-वडिलांना तुझे सरफराज सोबत अफेअर असल्याचे खोटे सांगेन’, अशी धमकी दिली.

व सरफराजने मुलीवर तिच्या इच्छेविरूध्द बळजबरीने शरीरसंबंध केले. 10 जून, 2021 रोजी पीडीत मुलगी हिच्या वैद्यकिय तपासणीत ती गर्भवती असल्याचे उघड झाले.

त्यानंतर पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सरफराज व अरबाजविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले.

पुरावे साक्षी या ग्राह्य धरून आरोपी सरफराज इकबाल शेख याला श्रीगोंदा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मरेपर्यंत जन्मठेप व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button