ताज्या बातम्या

2023 Tata Nexon : 453 किमी रेंज देणाऱ्या टाटाच्या ‘या’ कारची लोकांमध्ये चर्चा ! खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता झाली लॉन्च…

ही कार लॉन्च होण्यासाठी लोक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. टाटाची ही कार 453 किमी रेंज देते. ही एक सर्वोत्तम कार आहे.

2023 Tata Nexon : भारतीय बाजारात टाटाने त्यांचे अस्तित्व कायम ठेवले आहे. टाटा ही नेहमी शक्तिशाली व मजबूत कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी कंपनी आहे. आता टाटाची नवीन कार एन्ट्री करणार आहे.

ही कार म्हणजे टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Nexon चे EV मॉडेल आहे. आज कंपनीने ही कार बाजारात लॉन्च केली आहे. यात आकर्षक रंगासह नवीन लक्झरी फीचर्स मिळतील. तसेच कंपनी 2023 Tata Nexon चे नवीन अपडेटेड व्हर्जन देखील लॉन्च केले आहेत.

सर्वाधिक वेग 120 किमी प्रतितास

2023 Tata Nexon EV मध्ये 378 लीटरची मोठी बूट स्पेस असेल. त्यामुळे या कारमध्ये लांबच्या मार्गावर प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. ही स्टायलिश कार 120 Kmph चा टॉप स्पीड देते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 453 किमी पर्यंत धावते.

9 सेकंदात 0 ते 100 किमी वेग

या कंपनीने 9 सप्टेंबरपासून आपली डॅशिंग कार 2023 Tata Nexon EV चे बुकिंग सुरू केले आहे. ही एक अतिशय पावरफुल असणारी कार आहे जी कंपनीचा दावा आहे की ही एसयूव्ही केवळ 9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकते.

दोन शक्तिशाली बॅटरी पॅकचा पर्याय

या शक्तिशाली कारमध्ये 40.5 kWh चा बॅटरी पॅक आहे. वेगवान चार्जरसह, ही आश्चर्यकारक कार 56 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. या कारमध्ये 10.25 इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन सिस्टम असेल. तसेच कंपनी 30.2 kWh बॅटरी पॅकचा पर्याय देखील देत आहे.

पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

2023 Tata Nexon EV ला पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. सुरक्षेसाठी यात एडीएएस आणि एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय कारमध्ये उपलब्ध आहे. यात 360-डिग्री कॅमेरा आहे. ही सॉलिड कार 245 Nm टॉर्क जनरेट करते, जी तिला रस्त्यावर उच्च कार्यक्षमता देण्यास मदत करते.

2023 Tata Nexon EV मध्ये 129 hp पॉवर

2023 Tata Nexon EV ची पॉवर 129 hp आहे. एवढेच नाही तर ग्लोबल NCAP कार क्रॅश टेस्टमध्ये कारला 5 स्टार मिळाले आहेत. ही सुरक्षित कार लेदरेट अपहोल्स्ट्री, टच-बेस्ड क्लायमेट कंट्रोल, वेटिलेटेड फ्रंट सीट्ससह येते.

Tata Nexon Facelift 2023: 4 प्रकारांमध्ये लाँच

कंपनीने Tata Nexon 4 प्रकारात लॉन्च केले आहे. या कारचे फियरलेस, क्रिएटिव्ह, प्युअर आणि स्मार्ट व्हेरियंटसह अनावरण करण्यात आले आहेत.

टाटा नेक्सॉन आणि नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट कोणकोणसोबत स्पर्धा करणार

ही कार सब 4 मीटर एसयूव्ही श्रेणीत येते. या प्रकारात या कारची मारुती ब्रेझा, मारुती फ्रंटएक्स, ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट आणि महिंद्रा XUV300 यांच्याशी थेट स्पर्धा आहे.

Tata Nexon फेसलिफ्ट आणि Nexon EV फेसलिफ्ट प्रकार आणि किंमत जाणून घ्या

Nexon Facelift स्मार्ट – एक्स शोरूम किंमत 8.09 लाख रुपये
Nexon Facelift स्मार्ट + – एक्स शोरूम किंमत 09.09 लाख रुपये
Nexon Facelift Pure – एक्स शोरूम किंमत 09.69 लाख रुपये
Nexon Facelift Creative – एक्स शोरूम किंमत 10.99 लाख रुपये
Nexon Facelift Creative + – एक्स शोरूम किंमत 11.69 लाख रुपये
Nexon Facelift Fearless – एक्स शोरूम किंमत 12.49 लाख रुपये
Nexon Facelift Fearless + – एक्स शोरूम किंमत 12.99 लाख रुपये

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button