2024 KTM 390 Duke : लॉन्च होणार नवीन KTM 390 Duke ! फीचर्स आणि किंमत पाहून तुम्हीही कराल खरेदी…
नवीन KTM 390 Duke ही बाइक लॉन्च केल्याव Bajaj Dominor 400, BMW G310 RR, Honda CB 300R, Triumph Speed 400, Harley Davidson X400 ला टक्कर देणार आहे.

2024 KTM 390 Duke : भारतीय बाजारात अनेक नवनवीन बाइक लॉन्च होतात. ज्या ग्राहकांना खूप पसंत पडत असतात. यामध्ये KTM ही अशी बाइक आहे जी तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात आवडीची आहे.
जर तुम्हीही KTM ची बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता KTM ने नवीन 390 Duke चे अनावरण केले आहे. जी लवकरच लॉन्च होणार आहे.
नुकतेच या बाईकची माहिती समोर आली आहे. त्यात नवीन डिझाइन, मोठे इंजिन, अपडेटेड फीचर्स, नवीन इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लॅटफॉर्मसह अनेक बदल करण्यात आले आहेत. 2024 ड्यूक 390 ला बूमरॅंग-आकाराच्या DRL सह स्प्लिट एलईडी हेडलॅम्प पुन्हा डिझाइन केले आहेत. त्याला मस्क्यूलर इंधन टाकी मिळते. बाईकला स्प्लिट सीट सेटअप आणि स्लीक एक्झॉस्ट सेटअपसह पुन्हा डिझाइन केलेला सबफ्रेम आणि स्विंगआर्म मिळतो.
वैशिष्ट्ये जाणून घ्या
नवीन ड्यूक 390 मध्ये मागील बाजूस मोनो-शॉक सेटअप आणि पुढील बाजूस 43 मिमी USD टेलिस्कोपिक सस्पेंशन सेटअप आहे. बाईकच्या पुढील बाजूस 320 mm डिस्क आणि मागील बाजूस 240 mm डिस्क आहे. यात ड्युअल-चॅनल एबीएस, कॉर्नरिंग आणि सुपरमोटो एबीएस मिळतात.
बाईकमध्ये मिशेलिन टायर आणि 17-इंच अलॉय व्हील आहेत. तथापि, भारतीय आवृत्तीमध्ये भिन्न टायर मिळू शकतात. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल्स आणि म्युझिक कंट्रोलसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 5-इंचाचा TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो.
इंजिन स्पेसिफिकेशन
नवीन Duke 390 मध्ये 399 cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन आहे जे 44 Bhp आणि 39 Nm जनरेट करते. यात स्लिपर-क्लच आणि क्विक-शिफ्टरसह 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. बाइकमध्ये राइड मोड्स – स्ट्रीट, रेन आणि ट्रॅक देखील उपलब्ध आहेत. प्रथमच, ड्यूक 390 लाँच कंट्रोलसह सुसज्ज असेल.
भारतात कधी लाँच होणार?
ही बाइक भारतात लॉन्च काही महिन्यांत अपेक्षित आहे. त्याच्या भारतीय आवृत्तीत काही बदल केले जाऊ शकतात. तसेच नवीन Duke 390 ची किंमत रु. 3 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.