अहमदनगरताज्या बातम्या

MSRTC News : एसटीच्या ताफ्यात मार्च २०२४ पर्यंत २२०० नव्या गाड्या ! एसटी महामंडळाकडून सुरुवात

MSRTC News : शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आता कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे ते अहमदनगर मार्गावर महामंडळाकडून पहिल्या इलेक्ट्रिक बससेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

यानंतर इंधन खर्च कपातीच्या दृष्टीने सीएनजी बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच एसटीच्या ताफ्यात २२०० नव्या बसेसची भर पडणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून मार्च २०२४ पर्यंत या नव्या बसेस रस्त्यावर धावणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या तीन वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आलेल्या नाहीत. मात्र कालमर्यादा संपलेल्या बसगाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने एसटी ताफ्यातील गाड्यांची संख्या १८ हजारांवरून आता १४ हजारांवर आली आहे.

Advertisement

दुसऱ्या बाजूला महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे प्रवासी संख्या वाढत आहे. सध्या एसटीची प्रवासी संख्या ५५ लाखांवर पोहोचली आहे. मात्र त्या त्या तुलनेने महामंडळाच्या ताफ्यात गाड्यांची संख्या कमी आहे.

दरम्यान, २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात एसटीला डिझेलवरील साध्या बसेस घेण्यासाठी राज्य शासनाने ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ताफ्यात मार्च २०२४ पर्यंत २२०० नव्या एसटी बसेस दाखल होणार आहेत. ११ मीटर चेसीसवर बांधलेल्या साध्या परिवर्तन बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होतील.

दरम्यान, महामंडळाने प्रथमच थेट तयार बसेस घेण्यासाठी मोठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी एसटी महामंडळ चेसीस म्हणजे सांगाडा खरेदी करून त्यावर आपल्या मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणी करत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

Advertisement

बसखरेदीची निविदा प्रक्रिया २० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर टप्याटप्याने बस येण्यास सुरुवात होईल. शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Related Articles

Leave a Reply

Back to top button