बनावट कागदपत्रे वापरून खरेदी केलेली 30 हजार सीमकार्ड बंद !

दूरसंचार सेवा प्रदाते यांनी जारी केलेले ३० हजारांपेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाईल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसएने या सर्व मोबाईल जोडण्या तपासल्या असून, त्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे एकाच छायाचित्राचा वापर करून वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आल्याचे आढळून आले आहे.
एकूण ६२ समूहांमध्ये ८ हजार २४७ असे ग्राहक आढळले आहेत. याचाच अर्थ यात पॉइंट ऑफ सेल, म्हणजेच जिथून यांची विक्री केली जाते, असे सिम विक्रेते, यांचाही बनावट सिम कार्ड देण्याच्या कारस्थानात सहभाग असल्याचे स्पष्ट होते. एका प्रकरणात तर एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला ६८४ वेगवेगळे मोबाइल क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संचार साथी पोर्टलचे उद्घाटन केले. या सोहळ्यात आभासी पद्धतीने सहभागी झाल्यानंतर पत्रकारांना संचार साथी या पोर्टलबद्दल तसेच एएसटीआर अस्त्र या चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या तसेच माहितीचे विश्लेषण करणाऱ्या विविध तंत्राचा वापर असलेल्या प्रणालीची माहिती मुंबईतील दूरसंचार विभागाचे अतिरिक्त महासंचालक एच. एस. जाखड यांनी दिली दूरसंचार विभागाने,
बनावट सिम कार्डचे हे रॅकेट शोधून काढण्यासाठी एक अभिनव, स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म (सुपर कॉम्प्युटरचा वापर करून) ASTR- अस्त्र यात कृत्रिम बुद्धिमत्ता अक आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे .
सायबर गुन्ह्यांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी बनावट / खोट्या मोबाईल कनेक्शनचा तपास करणे, ते ओळखणे आणि ते नष्ट करणे या दृष्टिकोनातून दूरसंचार विभागाद्वारे या तंत्रज्ञानाची रचना आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे दूरसंचार विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सांगितले.
या प्रणालींतर्गत, ग्राहकांचे छायाचित्र आणि त्यांची माहिती यांची तुलना केली जाते, आणि त्यातून मिळणारी माहिती, वेगवेगळ्या नावांच्या त्याच छायाचित्राच्या महितीशी पडताळून पाहिली जाते बनावट / खोट्या माहितीच्या आधारे घेतलेले मोबाईल सीमकार्ड, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक,राष्ट्रविरोधी करवायांसाठी वापरले जाऊ शकतात आणि अशी बनावट कागदपत्रे तयार करणारे यात इतके चलाख असतात की त्यांनी अशी बनावट ओळखपत्रे,
निवासाचे पुरावे तयार केले आहेत, जे मानवी नजरेतून कधीही पकडले जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच, दूरसंचार विभागाने असे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एएसटीआर अस्त्र या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मचा वापर करत अशा बनावट खोट्या सिम्सचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.