आरोग्य

5 Herbal Drinks for Weight Loss : लठ्ठपणा झटपट कमी करायचाय? तर रिकाम्या पोटी ‘हे’ 5 हर्बल पेये पाण्यात मिसळून प्या, लगेच दिसेल फरक

वजनवाढ किंवा लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूलभूत कारण आहे. यासाठी तुम्हाला योग्य प्रकारे वजन कमी करणे खूप गरजेचे आहे.

5 Herbal Drinks for Weight Loss : देशात सध्या अनेक लोक वजनवाढीच्या समस्येमुळे हैराण आहेत. अशा वेळी तुम्ही तुमच्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.

दरम्यान आज आम्ही तुम्हाला काही हर्बल ड्रिंक्सबद्दल सांगणार आहे. हे हर्बल ड्रिंक्स वजन कमी करण्यात आश्चर्यकारक काम करतात. जर तुम्ही व्यायामासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी या हर्बल ड्रिंक्सचे सेवन केले तर निश्चितच एका महिन्यात तुम्ही स्लिम होण्यास सुरुवात कराल. दिवसाची सुरुवात करण्यासाठी ही हर्बल पेये सर्वोत्तम पर्याय आहेत. जाणून घ्या या हर्बल ड्रिंकबद्दल…

1. मेथी पाणी

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सर्व काही करून कंटाळले असाल, तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या पाण्याने तुमच्या दिवसाची सुरुवात करा. मेथीच्या दाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

मेथीचे पाणी बनवण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि गाळून सकाळी प्या. दुसरा उपाय म्हणजे सकाळी मेथी पाण्यात उकळून घ्यावी आणि थंड झाल्यावर प्यावी.

2. जिरे पाणी

सकाळची सुरुवात जिऱ्याच्या पाण्याने करा. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर देखील आढळतात, जे प्यायल्यानंतर दिवसभर भूक लागत नाही. तसेच जिरे-पाणी शरीर आणि मन दोन्ही दिवसभर ताजेतवाने ठेवते. जिर्‍यामध्ये सुगंधाचा गुणधर्म देखील असतो ज्यामुळे सूज येणे आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.

3. आले पाणी

वजन कमी करण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी आल्याचे पाणी घेणे खूप फायदेशीर आहे. आले अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे दिवसभर पोटाला आराम देतात.

4. हळद आणि काळी मिरी

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पाणी उकळा आणि त्यात थोडी हळद आणि काळी मिरी पावडर टाका. त्यानंतर ते गाळून चहाप्रमाणे सेवन करा. महिन्याभरात जड शरीर पातळ होऊ लागेल.

5. तुळशी पाणी

तुळशीला भारतात सर्वात पवित्र मानले जाते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळशीच्या पाण्यात मौल्यवान अँटिऑक्सिडंट्स आढळतात. हे सकाळसाठी सर्वोत्तम पोषक आहे. चहासारखे बनवा आणि सकाळी चहा ऐवजी तुळशीचे पाणी घ्या. वजनासह अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button