Saturday, February 24, 2024
Homeसरकारी योजनाराज्यातील ५८५ शेतकऱ्यांनी घेतला सलोखा योजनेचा लाभ

राज्यातील ५८५ शेतकऱ्यांनी घेतला सलोखा योजनेचा लाभ

Government scheme : सलोखा योजनेतून आतापर्यंत राज्यातील ५८५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या दस्त नोंदणीद्वारे एकूण ५ कोटी १२ लाख ४० हजार ९६३ रुपयांची शुल्क माफी करण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

राज्याच्या ७ विभागांतील ५८५ दावे सलोखा योजनेअंतर्गत निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये अमरावती विभागातून सर्वाधिक १४४ दावे निकाली काढण्यात आले,

त्यापाठोपाठ लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि नागपूर व पुणे विभागाचा समावेश आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून, प्रलंबित असलेले विविध दावे सलोख्याने निकाली निघत आहेत, असे विखे यांनी सांगितले.

■ शेतजमिनीच्या संदर्भातील वाद सलोखा योजनेमुळे मिटत असून, शेतकऱ्यांमध्ये सौख्य आणि सौर्हादाची भावना निर्माण होत आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री विखे-पाटील यांनी केले आहे.

सलोखा योजना काय आहे?

शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात. ते मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सलोखा योजना आणण्यात आली आहे.

या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल,

तर अशा शेतजमीनधारकांच्या दस्तांच्या अदलाबदलीसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत दस्तनोंदणीच्या अदलाबदलीसाठी मुद्रांक शुल्क १ हजार रुपये आणि नोंदणी फी १००० रुपये आकारण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments