Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरथोरात कारखान्याकडून ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप

थोरात कारखान्याकडून ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप

Ahmednagar News : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन २०२३ २४ या हंगामात ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले, चालू हंगाम हा अत्यंत अडचणीचा आहे. या कारखान्यावर सर्व सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे.

दुष्काळी परिस्थितीत असतानाही चालू हंगामात ६ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा पार केला आहे. हे वर्ष थोर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने कारखाना प्रशासकीय नवीन इमारतीमध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला. याचबरोबर या निमित्ताने विविध उपक्रम राबवले आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम कार्यक्षमता व अचूकता राखून सभासद शेतकरी ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. या चांगल्या कामाबद्दल कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे.

एका दिवसात विक्रमी गाळप थोरात कारखान्याने ५५०० मे. टन व ३० मेगावॅट क्षमता असलेला नवीन कारखाना सुरू केला. त्यामुळे खर्च कमी होऊन उत्पादन वाढले आहे. एका दिवसात ९१२० मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप झाले असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले. हे सामूहिक यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments