7th pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! 50% डीए वाढीबाबत झाला निर्णय; जाणून घ्या नवीन अपडेट
आता जुलै महिन्यात सरकार डीए वाढवणार आहे, मात्र त्याआधी कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 42 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याची बातमी येत आहे.

7th pay commission : मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी गोड बातमी देत असते. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला विषय आता मार्गी लागण्याचे संकेत दिसत असून याबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे.
यामुळे तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप आनंद देणारी आहे. त्यामुळे सरकार नक्की तुमच्यासाठी काय निर्णय घेणार व तुम्हला याचा कसा फायदा होणार याबाबत तुम्ही जाणून घ्या.
जर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत विचार केला तर केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए वाढ) वर्षातून दोनदा वाढ केली जाते. आता जुलै महिन्यात सरकार डीए वाढवणार आहे.
मात्र त्याआधी कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 42 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याची बातमी येत आहे. सरकारच्या या निर्णयानंतर पगारात थेट 9000 रुपयांची वाढ होणार आहे.
जुलैमध्ये वाढ होणार आहे.
सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला आहे, त्यानंतर महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे. ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू झाली. आता पुढील महागाई भत्ता जुलै 2023 पासून जाहीर होणार आहे. पुढील वाढ देखील 4 टक्के होईल, अशी अपेक्षा आहे.
पगारात बंपर वाढ होणार
वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात चांगली वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामुळे आगामी काळात पगारवाढ होऊ शकते. याबाबत अनेक अंदाज वर्तविले जात आहेत.
50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर DA शून्य होईल
महागाई भत्त्याचा नियम असा आहे की, जेव्हा सरकारने 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू केला तेव्हा त्या वेळी महागाई भत्ता शून्य करण्यात आला होता. नियमांनुसार, महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि 50 टक्क्यांनुसार कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडले जातील.
पगारात 9000 रुपयांनी वाढ होणार आहे
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याला 50% DA पैकी 9000 रुपये मिळतील. परंतु, DA 50% झाल्यानंतर, तो मूळ पगारात जोडला जाईल आणि पुन्हा महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल. अशा प्रकारे हे संपूर्ण गणित असेल.