7th Pay Commission : सणासुदीच्या दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! सरकार DA बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता…
सध्या देशात सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी मिळू शकते. कारण कर्मचाऱ्यांचा डीए वाढण्याची शक्यता आहे.

7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता सणासुदीच्या दिवसात मोदी सरकार कर्मचाऱ्यांना एक मोठा आनंदाचा धक्का देणार आहे.
मेलेल्या माहितीनुसार डीएमध्ये तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत आतापर्यंत मिळालेला महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 45 टक्के होईल. असे झाल्यास सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळेल.
सध्या 42% महागाई भत्ता मिळतोय
सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करते. यातील पहिली वाढ म्हणजेच DA ची वाढ 24 मार्च 2023 रोजी करण्यात आली होती आणि वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी जानेवारी 2023 पासून लागू होईल.
त्यानंतर सरकारने डीएमध्ये चार टक्के वाढ केली, ज्यामुळे तो 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला. आताही त्यात 4 टक्के वाढ करण्याची मागणी होत असली तरी सरकार डीए 3 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.
अलीकडेच एका पीटीआयच्या रिपोर्टमध्ये, ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले होते की, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची मागणी आहे.
डीए कसा निश्चित केला जातो?
सध्या याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेले नाही, मात्र सीपीआय-आयडब्ल्यूच्या आकडेवारीकडे पाहता अशी आशा व्यक्त केली जात आहे. वास्तविक, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय कामगार ब्युरोने जारी केलेल्या अद्यतनित CPI-IW च्या आधारे केंद्र सरकारने घेतला आहे.
जर आपण त्याची आकडेवारी पाहिली तर, जुलै 2023 मध्ये, CPI-IW 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास, यात सुमारे 0.90 टक्के वाढ दिसून येते.
सरकार दोनदा डीए वाढवते
केंद्र सरकारने दुसऱ्या सहामाहीत केंद्रीय कर्मचार्यांचा डीए तीन टक्क्यांनी वाढवून 45 टक्के करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे फायदे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जुलै 2023 पासून मिळतील.
याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या पगारात जोरदार वाढ होणार आहे. चलनवाढीचा दर लक्षात घेऊन केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे.
पगारवाढीचा संपूर्ण हिशोब जाणून घ्या
जर कर्मचार्यांना 3 टक्के डीए वाढीची भेट मिळाली तर महागाई भत्ता 45 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार पगारवाढीचा हिशोब केला, तर एका कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18000 रुपये आहे असे समजा.
त्यामुळे आत्तापर्यंत, या आधारावर 42 टक्के डीए 7,560 रुपये येतो. परंतु 45 टक्के दराने पाहिल्यास ते 8,100 रुपये होईल. म्हणजेच मासिक पगार थेट 540 रुपयांनी वाढेल.
जर आपण कर्मचार्याचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये पाहिले, तर सध्या या रकमेवरील डीए 23,898 रुपये आहे, तर तीन टक्के वाढीनंतर ते 25,605 रुपये होईल.