7th Pay Commission : कर्मचार्यांसाठी गोड बातमी ! मोदी सरकार ‘या’ महिन्यात घेणार मोठा निर्णय; मिळणार फायदेच-फायदे…
मोदी सरकार या महिन्यात कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी अनेक आनंद देणाऱ्या बातम्या येत असतात. कारण मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेकवेळा चांगले निर्णय घेत असते. याचा फायदा देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होत असतो.
आताही मोदी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गेले अनेक दिवस चर्चेत असणारा विषय आता मार्गी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता दिला जाईल हे या महिन्यात येणाऱ्या AICPI निर्देशांकाच्या आकड्यांवरून स्पष्ट होणार आहे.
जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढणार आहे
जुलै महिन्याचा AICPI इंडेक्स क्रमांक हा महागाई भत्ता (DA) च्या गणनेसाठी अंतिम डेटा असेल. त्याआधारे यावेळी कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढणार की आणखी वाढणार हे कळेल. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार असेल.
सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घोषणा होऊ शकते
मार्च 2023 मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली होती, जी जानेवारी 2023 पासून लागू झाली होती. त्याची पुढील पुनरावृत्ती जुलै 2023 मध्ये होणार आहे, परंतु असे मानले जाते की त्याची अधिकृत घोषणा दिवाळीपूर्वी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात केली जाऊ शकते.
4% DA वाढ अपेक्षित, वाढ अपेक्षित
यावेळीही सरकारकडून डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मे 2023 पर्यंत, AICPI निर्देशांकाचा आकडा 45.58 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या निर्देशांक 134.7 आहे. जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे.
सरकारने जानेवारी-जुलै सहामाहीत डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 42 टक्क्यांवर पोहोचला. यावेळीही सरकारने 4 टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए ४६ टक्के होईल. अशा प्रकारे सरकारने हा निर्णय जाहीर केला तर नक्कीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.