7th Pay Commission News : सणासुदीच्या दिवसात एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! डीए आणि डीआर वाढीबाबत सरकारची मोठी घोषणा…
एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकार डीए आणि डीआर वाढीबाबत निर्णय घेऊ शकते.

7th Pay Commission News : गेले अनेक दिवस केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक डीए आणि डीआर वाढीबाबत सरकारच्या घोषणेची वाट पाहत आहेत. अशा वेळी आता कर्मचाऱ्यांना गुड न्युज मिळणार आहे.
जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आतासणासुदीच्या दिवसात महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ होण्याची त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, केंद्र सरकार पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये कधीही त्यांच्या डीए आणि डीआरमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
याबाबत AICPI निर्देशांकाच्या आकड्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, सलग तिसऱ्यांदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार आहे. या संदर्भात अनेक बातम्या सध्या प्रसारित होत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकार कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेते आणि AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.
वास्तविक, केंद्र सरकार एआयसीपीआय निर्देशांकाच्या संख्येवर आधारित, जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा डीए आणि डीआरचे वाढवते. जर तुम्ही AICPI निर्देशांकाच्या आकड्यांवर नजर टाकली तर तो जानेवारीमध्ये 132.8, फेब्रुवारीमध्ये 132.7, मार्चमध्ये 133.3, एप्रिलमध्ये 134.2, मेमध्ये 134.7 आणि जूनमध्ये 136.4 होता.
त्याचसोबत जूनमध्ये डीए वाढीचा स्कोअर 46.24 टक्क्यांवर गेला होता. त्याआधारे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सलग तिसऱ्यांदा 4 टक्क्यांनी वाढून 42 वरून 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डीएमध्ये किती वाढ होणार?
सरकार यावेळी डीएमध्ये किती वाढ होणार, हे घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. कारण शासनाचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे डीए वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत कोणताही अतिरिक्त अंदाज लावता येणार नाही.
मात्र जर यावेळी महागाई भत्ता 4 टक्के असेल तर तो 46 टक्क्यांपर्यंत वाढेल. केंद्रीय कर्मचार्यांचा पगार वार्षिक 8,000 रुपयांवरून 27000 रुपयांपर्यंत वाढू शकतो, याबाबत स्पष्टता जाणवत आहे.