7th pay commission News : खुशखबर ! फक्त 10 दिवस बाकी अन् केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी; जाणून घ्या काय मिळणार भेट…
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै महिन्यात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. सध्या मे आणि जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी असून, ते 30 जून रोजी जाहीर होणार आहेत.

7th pay commission News : मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी खुश करत असते. अशा वेळी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एक विषय मार्गी लागण्याच्या तयारीत आहे. कारण यावर आता निर्णय होऊ शकतो.
त्यामुळे जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे. मात्र ही गुड न्युज मिळण्यासाठी तुम्हाला अजून 10 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून यावर चर्चा होत आहे, मात्र आता एआयसीपीआयने आतापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यावेळीही सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 4 टक्क्यांनी वाढ करणार आहे. सध्या मे आणि जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी असून, ते 30 जून रोजी जाहीर होणार आहेत.
10 दिवसांनंतर आकडेवारी जाहीर केली जाईल
सरकार यावेळी महागाई भत्त्यात किती वाढ करणार आहे. हे 30 जून रोजी येणार्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल. याशिवाय यावेळी सरकार महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे. अशा वेळी AICPI निर्देशांकाचा आकडा 135 वर पोहोचला तर महागाई भत्त्यात नक्कीच मोठी झेप घेता येईल.
DA 46 टक्के असू शकतो
या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये हा आकडा 135 वर पोहोचला तर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीएमध्ये नक्कीच 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, त्यानंतर 42 टक्के दराने मिळणारा डीए 46 टक्क्यांवर पोहोचेल आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
महागाई भत्ता कशाच्या आधारावर वाढतो?
महागाईचा दर लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ केली जाते. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडूनही महागाई भत्त्यात वाढ केली जाते. कामगार ब्युरो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची गणना करते. त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे केली जाते.
किती पैसे वाढतील?
सध्या सरकारी कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्यावर त्याला 42 टक्के महागाई भत्ता म्हणजेच 7560 रुपये मिळतात. पण महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढला, तर महागाई भत्ता दरमहा 8280 रुपये होईल. त्यानुसार दरमहा 720 रुपयांनी पगार वाढणार आहे. त्यामुळे याचा चांगला फायदा कर्मचाऱ्यांना होणार असून कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.