7th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांची पुन्हा लागणार लॉटरी! केंद्र सरकार लवकरच इतका वाढवणार DA, पगारात होणार बंपर वाढ
कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार लवकरच पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून सतत कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. मार्च २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारकडून वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे.
देशातील अनेक राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. आता केंद्र सरकारकडून देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वर्षातील दुसरी DA केली जाऊ शकते. याबाबत कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारकडून येत्या काळात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टाके वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होईल. मार्च २०२३ मध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये सरकारकडून ४ टक्के वाढ करण्यात आली होती.
मार्च २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांचा DA वाढवण्याअगोदर तो ३८ टक्के होता मात्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ केल्याने DA ४२ टक्के झाला आहे. तसेच आता दुसरी DA वाढ देखील ४ टक्क्यांनी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवण्यात येतो. हा DA जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये वाढण्यात येतो. दर सहा महिन्यांनी DA वाढवला जातो मात्र यंदा DA वाढवण्यास विलंब झाला असून आत कर्मचाऱ्यांना लवकरच दुसरी DA वाढीची गोड बातमी मिळू शकते.
केंद्र सरकार महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवू शकते
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या महागाई भत्ता वाढीमध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होईल. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये दुसरी DA वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्र सरकारचे ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारक आहेत. त्यांना आगामी DA वाढीचा फायदा होऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये देखील चांगली वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नुकतीच मध्य प्रदेश सरकारने डीए वाढवला
मध्य प्रदेश सरकारकडून देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ४ टक्के DA वाढवला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. तसेच ओडिशा सरकारने देखील कर्मचाऱ्यांची DA वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्क्यावरून ४२ टक्के झाला आहे. जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना DA वाढीचा फायदा दिला जाणार आहे.