8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! सरकार पगारात बंपर वाढ करण्याच्या तयारीत; जाणून घ्या आकडेवारी
तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असाल तर ही बातमी उपयुक्त आहे.

8th Pay Commission :केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांबाबत नेहमी विचार करत असते. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमी नवनवीन फायद्यांचा लाभ मिळत असतो.
लोकसभा निवडणूका हळू हळू जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी येण्याचे संकेत दिसत आहेत. कारण मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या तयारीत आहे.
जर तुमच्या घरात सरकारी कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्या फायदाची ठरणार आहे. कारण यापूर्वी केंद्र सरकार 7व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांसाठी कोणताही आयोग स्थापन करणार नसल्याची चर्चा होती, मात्र आता सरकार याबाबत पुन्हा विचार करत असल्याचे समजते आहे.
किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते
सातव्या वेतन आयोगानंतर आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नाही तर 8 व्या वेतन आयोगाची फाईलही तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा स्थितीत सरकार पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनातही मोठी वाढ होऊ शकते.
2024 मध्ये लोकसभा निवडणुका
पूर्वी सुरू असलेल्या चर्चेच्या आधारे आठवा वेतन आयोग येणार नाही, अशी अपेक्षा होती. पण, आता सातव्या वेतन आयोगानंतर पुढील वेतन आयोग आणण्याची तयारी सुरू आहे.
या सर्व प्रकाराबाबत शासनाकडून कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. खरे तर 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीचे वर्ष पाहता कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची नाराजी सरकारला बघायची नाही.
निवडणुकीपूर्वी घोषणा होऊ शकते
पुढील वेतन आयोगाची घोषणा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केली जाऊ शकते. नव्या वेतन आयोगात काय होणार आणि काय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांवर असेल.
त्यांच्या देखरेखीखालीच समिती स्थापन केली जाईल. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात. दरम्यान, तुमच्या माहितीसाठी सांगतो की सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते.