अहमदनगर

१३ वर्षीय मुलगा ठरलाय जिल्ह्यात कौतुकाचा विषय ! वाचवले असे शेतकर्‍याचे प्राण…

अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने गळफास घेणाच्या प्रयत्नात असलेल्या शेतकर्‍याचे प्राण वाचण्याची घटना घडली आहे. प्राण वाचवणार्‍या अथर्व अशोक खेडकर हा तालुक्यासह जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अथर्व खेडकर (रा.चिंचपूर इजदे) हा शाळेला सुट्टी असल्याने तालुक्यातील कोल्हार येथे मामाच्या गावी आलेला होता. 24 एप्रिलला तो मामाच्या घराबाहेर उभा असतांना एका महिलेचा वाचवा वाचवा, मदत करा असा आवाज ऐकल्याने तो धावत गेला.

शेजारील शेतात बाळासाहेब विष्णू पालवे (वय 37) हा शेतकरी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याला दिसले.यावेळी सतर्क राहत धाडस दाखवत अथर्व हा त्याच्या जवळ गेला आणि त्याने पालवे यांचे दोन्हीही पाय खालून उचलून धरल्याने पालवे यांचा जीव वाचला.

पालवेंच्या पत्नीच्या आवाजाने शेजारील शेतकरी आले व त्यांनी पालवेंना खाली उतरवत नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले व त्याचे प्राण वाचवले. अथर्वने जे धाडस दाखवले

त्यामुळे पालवे यांचे प्राण वाचल्याने कोल्हार ग्रामपंचायतीने ठराव करून अथर्वच्या धाडसाचे कौतुक केले तर पाथर्डीचे पोलिस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी सुद्धा अथर्वला पोलीस स्टेशनमध्ये बोलावत त्याचा गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button