अहमदनगर

एकोणवीस वर्षीय युवती राहत्या घरातून झाली बेपत्ता

राहाता येथील 19 वर्षीय कु. ॠतुजा गंगाधर भुजबळ (रा. 15 चारी) हि युवती राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ॠतुजा ही 25 एप्रिल रोजी सकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान राहत्या घरातून कुणास काहीही न सांगता निघून गेली आहे.

त्यांच्या घराच्या आजूबाजूला राहाता, पिंपळस गावात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याबाबत मुलीचे वडील गंगाधर तयाराम भुजबळ यांनी राहाता पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन राहाता पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.

मुलीचे वर्णन

सदरची मुलीची उंची 5 फुट 3 इंच आहे. रंगाने गोरी, डोळे घारे, कपाळ उंच, केस लांब, गुलाबी रंगाचा कुर्ता व काळे रंगाची पँट असे कपडे परिधान केले आहेत. पायात चप्पल असे वर्णन आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button