अहमदनगर

पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय, सरकार 25000 सरकारी नोकऱ्या देणार

पंजाबमधील सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. पंजाब मंत्रिमंडळाने शनिवारी पंजाबपोलिस विभागात 10,000 आणि इतर सरकारी विभागांमधील 15,000 रिक्त पदांसह एकूण 25,000 सरकारी नोकऱ्या प्रदान करण्याचा ठराव मंजूर केला.

बैठकीत राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले. पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्र्यांना शपथ देण्यात आली.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एका महिलेसह आम आदमी पक्षाच्या (आप) दहा आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.

पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या 10 मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली.

हरपाल सिंग चीमा, हरभजन सिंग, डॉ. विजय सिंगला, लाल चंद, गुरमीत सिंग मीत हेअर, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्म शंकर झिम्पा, हरजोत सिंग बैंस आणि डॉ. बलजीत कौर यांना शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 18 पदे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button