अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : पुणे-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात..

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील कुर्‍हाडे वस्ती येथे कारचा भीषण अपघात झाला.

यामध्ये तिघे जखमी झाले असून ही अपघाताची घटना बुधवारी दि.18 मे रोजी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

अभिजीत शंकर लुगडे (वय 27, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), प्रसाद पद्माकर कलाल (वय 32 रा. नवी मुंबई) व एक महिला नाव समजू शकले नाही.

असे तिघे कारमधून (क्र. एमएच. 12, यूसी. 2174) नाशिकला कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून पुन्हा ते संगमनेरमार्गे पुणेच्या दिशेने जात होते.

बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील माळवाडी कुर्‍हाडे वस्ती येथे आले असता त्याचवेळी कारला भीषण अपघात झाला.

त्यामुळे कार थेट महामार्गावर आडवी झाली. त्यानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. म्हणून काही वाहनचालकांसह नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button