अहमदनगर

केतकी चितळेवर आता अहमदनगरमधील ‘या’ तालुक्यात गुन्हा दाखल

खा.शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ होत असून मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिच्यावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत

आता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे केतकी वर गुन्हा दाखल झाला असून शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी फिर्याद दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व शरद पवार यांच्याबद्दल सोशल नेटवर्किंगवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणारी अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल झाला असून पारनेर पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घ्यावे.

अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी केली आहे. वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी अटक केली असताना, रबाळे पोलिसांनीदेखील तिचा ताबा घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

तिच्यावर २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र, तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनदेखील नवी मुंबई पोलिसांकडून आठ महिने तिच्या अटकेत हात आखडता घेतल्याचे तक्रारदार स्वप्नील जगताप यांनी रविवारी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button