अहमदनगर

घरात घुसून अपंग युवतीवर अत्याचार; पीडित युवती गर्भवती

अहमदनगर- कर्जत तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या अपंग युवती घरात एकटी असल्याचा फायदा घेत एका तरूणाने तिच्यावर अत्याचार केला. नगर येथील खासगी रूग्णालयात पीडित युवतीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. तिने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूण निलेश गंगावणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा कर्जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

सुमारे चार ते साडेचार महिन्यापूर्वी फिर्यादी युवती घरामध्ये एकटीच असताना गंगावणे याने तिच्या घरामध्ये प्रवेश केला. युवतीला घराच्या स्वयंपाक खोलीत बळजबरीने घेवून जात गळा दाबून अत्याचार केला. सदरची घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

 

सदर घटनेनंतर पीडिताने सुमारे चार ते साडेचार महिन्यानंतर नातेवाईकांना माहिती दिली. तिची प्राथमिक तपासणी कर्जत येथील रूग्णालयात करण्यात आली. पीडिता गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

यानंतर पुढील वैद्यकीय तपासणी नगर शहरातील खासगी रूग्णालयात करण्यात आली. तेथील डॉक्टरांनी गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. यानंतर सदरचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल होवून तो कर्जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button