Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : अहमदनगरमधील 'या' गावातील ग्रामपंचायत सदस्याच्या घरात निघाला पाच फुटाचा...

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावातील ग्रामपंचायत सदस्याच्या घरात निघाला पाच फुटाचा कोब्रा !! पाहूनच सर्वांना धडकी..

साप म्हटलं की आपोआप तोंडातून ‘अरे बापरे’ असे शब्द निघतात. साप पाहिला की भल्याभल्यांची तंतरते. जर अचानक साप तोही कोब्रा येऊन उभा राहिला तर? वाचूनच धक्का बसला ना? पण हे असंच काहीस घडलंय. अहमदनगरमधील एका ग्रामपंचायत सदस्यांच्या घरातच कोब्रा तेही पाच ते सहाफुटी लांबीचा हा साप घुसला, त्यानंतर..

नगर शहराजवळील चांदबीबी महाल परिसरातील एका गावातील एका ग्रामपंचायत सदस्याच्या घरात शुक्रवारी कोब्रा जातीचा साप आढळून आला. त्यामुळे घरातील सर्व जण हादरून गेले. यावेळी एका सार्पमित्रास तातडीने संपर्क केल्यानंतर त्यांनी तातडीने गावात दाखल होत सापाला पकडून निसर्गात मुक्त केले.

उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने जमिनीमध्ये राहणारे साप हवेसाठी बाहेर पडतात. ज्या ठिकाणी थंड वातावरण आहे तेथे बसतात. या गावात येथे आढळून आलेला कोब्रा पाच फूट लांब होता. त्याला पाहताच अनेकांच्या मनात धडकी भरली.

कोब्रा पकडल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पकडलेला कोब्रा दुसऱ्या दिवशी त्या सर्पमित्राने वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त केला.

यावर्षी कोब्रा, अजगर, घोणस व मन्यार आदींसह सर्व सर्प जातींमध्ये वाढ झाली असून आता उन्हाळ्यामुळे जमीन गरम झाल्यामले सर्व सर्प बाहेर निघत असतात. या गावात येथे घरात आढळून आलेला कोब्रा सापाला सर्पमित्र यांनी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने निसर्गात मुक्त केले.

नागरिकांनी कोठेही सर्प आढळल्यास त्यांना मारू नये, त्यासाठी सर्पमित्रांशी संपर्क करावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. सध्या या परिसरात लोकांमध्ये याच कोब्रा सापाची चर्चा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments