तीन वाहनांचा विचित्र अपघात, एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

Ahmednagar News: श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथे नगर, दौंड महामार्गावरील भीमानदीच्या पुलावर माल वाहतूक आयशर टेम्पो, टाटा कंपनीचा छोटा हत्ती, आणि कार, या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
चैतन्य पिंटू बिटके (वय १८), रा. वडगाव गुप्ता, नगर तालुका, असे मयत तरुणाचे नाव असून, जखमींची नावे समजू शकले नाहीत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निमगाव खलू येथील नगर,
दौंड महामार्गावरील भीमानदीच्या पुलावर दौंडकडून नगरकडे भरधाव जाणाऱ्या एम. सी. १५०६ टाटा हत्ती, या मालवाहतूक एच.- ४६ बी. यु. -१६३६, या आयशर गाडीला जोराची धडक दिली.
याच वेळी टेम्पोने समोरून येणाऱ्या एम. एच. १६ सी. आयशर टेम्पोच्या मागे असणाऱ्या एम. एच. १२ पी. एच. ८५९३ या कारच्या चालकाला कारचा वेग वेग आवरता न आल्याने कारने आयशर टेम्योला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण आणि विचित्र अपघातात टाटा हत्तीचा चालक चैतन्य पिंटू बिटके रा. वडगाव गुप्ता ता. नगर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्योचालक आणि कारमधील एक जण गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर महामार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
तर मयत तरुणाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालवात हलविला. पुढील तपास पोलीस कर्मचारी मुकेश बढे करत आहेत.