अहमदनगरताज्या बातम्या

अहमदनगर शहरात आली चेन स्नॅचर्सची गँग ! १५ मिनिटांत दोघींचे दागिने लंपास

पहिली घटना न्यू आर्टस कॉलेजसमोर, तर दुसरी घटना कॉटेज कॉर्नर चौकात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagar News : अहमदनगर पंधरा मिनिटांच्या फरकाने दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

पहिली घटना न्यू आर्टस कॉलेजसमोर, तर दुसरी घटना कॉटेज कॉर्नर चौकात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निंबळक (ता. नगर) येथील ऐश्वर्या पांडुरंग कांबळे या शुक्रवारी बुऱ्हाणनगर येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून परत येताना नगर-मनमाड रोडने जात असताना

Advertisement

रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास कॉटेज कॉर्नर परिसरात पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याच्या वजनाची सोन्याची चैन ओरबडली.

त्यांनी नागापूर पुलापर्यंत चोरट्याचा पाठलाग केला. मात्र तो मिळून आला नाही. त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.

त्यापूर्वी रासनेनगर येथील शोभा नितीन रासकर या न्यू आर्टस महाविद्यालयासमोरून जात असताना साडेआठ वाजेच्या सुमारास पाठीमागून आलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने ओरबडले. त्यांनी आवाज दिला. नागरिकही जमा झाले. मात्र चोरटा नागरिकांना चकवा देऊन पसार झाला

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button