अहमदनगरताज्या बातम्याराहुरी

पठानकोट येथे कार्यरत असलेल्या जवानाचा अहमदनगर मध्ये अपघातात मृत्यू

राहुरी – शिंगणापूर रोडवर पिंप्री अवघड शिवारात मोटारसायकल व चारचाकीच्या भीषण अपघातात उंबरे येथील सैन्यदलात असणारे जवान योगेश बाळसाहेब पटारे (वय २७) यांचा मृत्यू झाला. तर व्यावसायिक पवण राजेंद्र उंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरु आहे.

या अपघाताच्या घटनेमुळे उंबरे गावावर शोककळा पसरली असून योगेश पटारे हे पंजाब येथील पठानकोट येथे कार्यरत होते. त्यांची नुकतीच हैद्राबाद येथे बदली झाली होती. हैद्राबाद येथे जाण्यापूर्वी आपल्या दीड महिन्याच्या बाळाला भेटून ते दोन दिवसानंतर हैद्राबाद येथे हजर होण्यास जाणार होते.

दरम्यान, मंगळवारी (दि.१६) सकाळी पटारे व त्यांचे मित्र पवन उंडे हे श्रीरामपूरला मित्राच्या लग्नासाठी गेले होते. लग्नानंतर घरी जात असताना मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान, राहुरी-शिंगणापूर रोडवर समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने पटारे यांचा जागीच मृत्यू झाला.

उंडे हे अपघातात गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर संतप्त उंबरे ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. सदर रस्यावर कोठेही गतिरोधक किंवा कोठेही झेंब्रा क्रॉसिंग नसल्याने अपघातात आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत.

दरम्यान मृत्यू झालेले जवान योगेश पटारे यांच्यावर त्यांच्या गावी उंबरे येथील स्मशानमूभीत काल बुधवारी (दि.१७) सकाळी शोकाकुल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, तहसीलदार रजपूत, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button