अल्पवयीन मुलीने गळफास घेत संपविले जीवन

अहमदनगर – अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तेजस्विनी गोरक्षनाथ भताने (वय 15 रा. गाडेकर चौक, निर्मलनगर) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भताने कुटूंब सावडी उपनगरातील निर्मलनगरमधील गाडेकर चौकात राहते. सोमवारी दुपारी तेजस्विनी भताने या मुलीने राहत्या घरात गळफास घेतला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना लक्षात आली.
तेजस्विनीचे नातेवाईक संतोष कान्हुदेव आव्हाड यांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.
दरम्यान उपचारापूर्वीच तेजस्विनीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तेजस्विनीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे