अहमदनगर

मध्यरात्री अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले; पोलिसांनी बारा तासात शोधले

अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे मध्यरात्री एक घटना घडली. 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. दरम्यान बेलवंडी पोलिसांनी तातडीने सुत्र हलवत या मुलीची अवघ्या बारा तासच्या आत सुटका केली. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी सुनील दशरथ पावरा (रा. देवळी आडगांव ता. चाळीसगांव जि.जळगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजन शुगर सकारी साखर कारखान्यावर उसतोडीसाठी आलेले कामगार ढवळगांव येथे झोपडी बांधून राहत होते. यातील सुनील दशरथ पावरा यांची मुलगी कुटूंबीयासह झोपली होती.

 

सकाळी सहा वाजता कामासाठी सर्व उठल्यानंतर त्यांना त्यांची मोठी 9 वर्षीय मुलगी आढळुन आली नाही. त्यांनी दिवसभर इतर कामगारांसोबत परीसरात शोध घेतला. अखेर रात्री 9 वाजता बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी तातडीने सुत्र हलवून स्थानीक नागरीकांच्या विवीध व्हॉटसअप ग्रुपवर मुलीचे फोटो व वर्णनासह माहीती प्रसारीत केली.

 

त्यावेळी माठ येथील उमेश घेगडे व महेश महाडीक (रा. उकडगांव) यांनी सदर मिळतेजुळते वर्णनाची मुलगी ही उक्कडगाव बसस्टॅन्डवर लहान बाळासह असल्याचे पोलीसांना सांगीतले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे सहकार्‍यांनी त्या ठिकाणी जावुन अपहृत मुलगी तीच असल्याची खात्री केली. तसेच तीच्याकडे अधिक विचारपुस केली असता तीला एका पारधी समाजाच्या महीलेने ती पालाचे बाहेर लघुशंकेसाठी गेलेली असतांना पहाटेचे वेळी बळजबरीने घेवुन आल्याचे सांगीतले. संशयित महिला सुप्रिया सचीन काळे (22,रा. सातववाडी, अरणगांव दुमाला, ता. श्रीगोंदा) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button