अहमदनगर

अल्पवयीन मुलीचा पाठलाग भोवला; युवकास न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

अहमदनगर- अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी शुभम आप्पासाहेब दिघे (वय 22 रा. मोतीनगर, केडगाव) या युवकास न्यायालयाने दाखल गुन्ह्यात दोषी धरले. त्याला भादंवि कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम 12 नुसार दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीम.एम.एच.मोरे यांनी हा निकाल दिला. सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी कामकाज पाहिले. सदरच्या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अल्पवयीन पीडित मुलगी, पीडित मुलीची आई, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक तसेच तपासी अधिकारी इत्यादी साक्षीदार तपासण्यात आले. सदरच्या खटल्याची गुणदोषावर सुनावणी होवून न्यायालयाने आरोपी शुभम दिघे याला भादंवि कलम 354 (डी) नुसार दोषी धरून शिक्षा ठोठावली.

घटनेची थोडक्यात हकिगत अशी की, अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी शुभमला ओळखत होती. शुभम तिचा पाठलाग करित होता. तसेच बोलण्याचा प्रयत्न करीत होता. तो तिला म्हणाला की, तु मला खुप आवडते, असे म्हणून तिच्याशी नेहमी बोलू लागला. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2018, 24 नोव्हेंबर 2018 तसेच 01 जानेवारी 2019 रोजी शुभमने पीडीत अल्पवयीन मुलगी हिस धमकी देवून बळजबरीने दुचाकीवरून फिरायला नेले व चास (ता. नगर) येथील एका हॉटेलमध्ये बळजबरीने अतिप्रसंग केला. पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडिताने तिच्या आईसह कोतवाली पोलीस ठाण्यात जावून शुभम दिघे याचे विरूध्द फिर्याद दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button