अहमदनगर

क्लासला गेलेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही; ‘हे’ कारण आले समोर

अहमदनगर- क्लासला गेलेल्या अल्पवयीन मुलीला (वय 16) अज्ञात व्यक्तीने फूस लावुन पळवून नेले. ही घटना नगर शहरात घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

सदर मुलीचे वडील हे नगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून रोजगाराच्या निमित्ताने ते नगर शहरात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी शहरातील एका खासगी क्लासमध्ये दररोज शिकवणीला जात होती. बुधवारी सकाळी 7.30 वाजता ती घरातून क्लासला जाते असे सांगून गेली ती पुन्हा परतली नाही. दुपारनंतरही मुलगी घरी न आल्याने मुलीच्या कुटुंबियांनी तिची मैत्रिणी, नातेवाईक, क्लासमध्ये तसेच शहरात इतर ठिकाणी शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

 

त्यामुळे आपल्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची खात्री तिच्या कुटुंबियांना झाली. त्यानंतर तिच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button