निवारा बालगृहाला एक महिन्याचा किराणा भेट मॅरेथॉन डिजिटल होल्डिंगचा कौतुकास्पद उपक्रम

Ahmednagar news : मॅरेथॉन डिजिटल होल्डिंग जामखेड शाखेतर्फे ग्रामीण विकास केंद्र संचलित अनाथ, निराधार व लोककलावंताच्या मुलांकरिता कार्यरत असणाऱ्या निवारा बालगृहाला एक महिन्याचा किराणा भेट देण्यात आला.
सोबतच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अरुण आबा जाधव यांच्याशी मॅरेथॉन होल्डिंगचे केतन गर्जे यांनी संपर्क साधून संस्थेसाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी जाधव यांनी सध्या आम्हाला किराण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी गर्जे यांनी यांस सहमती देत आम्ही संस्थेला एक महिन्याचा किराणा देण्याचे आश्वासन दिले होते.
अखेर आज दिनांक 13 मे रोजी मॅरेथॉन डिजिटल होल्डींगच्या जामखेड येथील सहकाऱ्यांनी संस्थेस भेट देत एक महिन्याचा किराणा भेट दिला. समाजात काम करत असताना आपण या समाजाचे देणे लागतो, या भावनेतून आम्ही संस्थेला भेट देत असल्याचे गर्जे यांनी सांगितले.
तर विद्यार्थ्यांना महिन्याभराचा किराणा देऊन मॅरेथॉन डिजिटल होल्डींगने आपली सेवाभाववृत्ती दाखवल्याचे अरुण आबा जाधव आणि संतोष चव्हाण यांनी मॅरेथॉन डिजिटल होल्डिंग व सहकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी अरुण आबा जाधव, संतोष चव्हाण, केतन गर्जे, तेजस पंगुडवाले, यश भाकरे, जय चिंतामणी, अजिक्य राळेभात, केतन राळेभात, प्रज्वल राळेभात, राहुल राळेभात, ऋषी उबाले, सागर राळेभात, विशाल गीते, महेश डोके, वैभव सगर आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.