अहमदनगर

नगर जिल्ह्यात तब्बल सव्वा कोटी मे. टन उसाचे गाळप

यंदाच्या सुरू असलेल्या गळीत हंगामात अहमदनगर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी २६ एप्रिलपर्यंत १ कोटी २४ लाख ४८ हजार ७८६ मे टन उसाचे गाळप करून त्यापासून १ कोटी २१ लाख २४ हजार ४३३ साखर पोत्यांचे उत्पादन केल्याचा विक्रम केला आहे.

दरम्यान चालू हंगामात उन्हाची तीव्रता प्रचंड होती. बहुतांश साखर कारखान्यांनी आपलेच अनेक गाळपाचे विक्रम मोडीत काढून नव्याने असंख्य विक्रम प्रस्थापित केले आहे. राज्यात १९९ साखर कारखान्यांपैकी ७० कारखान्यांचा हंगाम बंद झाले आहेत, अजूनही शेतात एप्रिल महिन्याच्या अखेर ६५ ते ७० लाख टन ऊस गाळपाअभावी उभा आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप मे टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे :
साखर सहकारमहर्षि कोल्हे (८,१८,३२६) (७,३०,७५०),
कर्मवीर काळे (७,०९,८२८) (७,७२,८००) (१२.५१),
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील (९,२९,३३१) (७,१५,९००)
सहकारमहर्षि थोरात संगमनेर (१३,४७,३९०) (१४,१२,७१०) (११.००),
ज्ञानेश्वर (१४,५९,५५५) (१३.७८,५००) (१२.०९),
मुळा (१३,२९,१३०) (११,५८,६००) (११.७४)
अगस्ती (५,६५,३८६) (६,३१,८२३),
वृद्धेश्वर (५,००,७७०) (५.३९,३००) (१०.१५),
गणेश (३,५८,०५०) (२,७७,०५०), (११.०३)
केदारेश्वर (५,००,२२०) (४.८१,९५०) (१२.९०),
अंबालिका (१८.८५,१२०) (२०,२६,४००), (११.६५)
गंगामाई (१२,५४,३८०) (१२,०४,४५०) (१२.९०) याप्रमाणे गळीत झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button