अहमदनगर

प्रियसीबरोबर घडला धक्कादायक प्रकार; आधी अत्याचार आणि नंतर…

अहमदनगर- कोण कोणाला कसे लुटेल नेम नाही. एका पठ्ठ्याने तर प्रेयसीवर अत्याचार करून तिचे फोटो काढले य फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत 21 तोळे सोने लुटले.

 

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील तरुणाने एका मुलीशी ओळख वाढवून प्रेम व नंतर भेटीचे फोटो काढून ब्लॅकमेल करीत धमकीचा वापर करुन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच सोनई पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

 

या तरुणीने घाबरुन धमकी देणार्‍या तरुणास दिलेल्या 21 तोळे सोन्यापैकी विकलेले साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी सोनई, घोडेगाव व राहुरी येथील सराफांच्या दुकानातून हस्तगत केले आहे.

 

पिडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलीस ठाण्यात कथन केला असून बरोबर काढलेले फोटो इतरांना देण्याची धमकी देवून वेळोवेळी सोन्याचे दागिने व पैशाची मागणी करुन त्रास दिला. लैंगिक अत्याचार व धमकी देवून मानसिक, शारीरिक छळ केला असे फिर्यादीत नमूद केल्यानंतर पोलिसांनी घोडेगाव येथील निखील बाबासाहेब गायकवाड (वय 23) याच्या विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 12/ 2023 भारतीय दंड विधान कलम 376, 384, 354, 506 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

 

आरोपीस नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पथकाने आरोपीने विकलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी साडे अकरा तोळे सोने हस्तगत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button