Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरभरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची स्कुटीला धडक ! महिला जागीच ठार

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची स्कुटीला धडक ! महिला जागीच ठार

Ahmednagar News : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने स्कुटी चालक महिला जागीच ठार झाली.

काल शनिवारी (दि. १३) सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ही घटना घडली.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमएच २० ए ५८५८ ही नाशिककडून पुण्याकडे भरधाव वेगाने जात होती.

ही ट्रक नाशिक-पुणे महामार्गावरील शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आली असता ट्रक चालकाने नितू सोमनाथ परदेशी (वय ३७, रा. नेहरू चौक, संगमनेर) यांच्या मोपेड दुचाकीला क्रमांक एमएच १७ सीएस ४१९२ पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातामध्ये स्कुटीचे नुकसान झाले.

स्कुटी चालक नितू परदेशी अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले.

यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला. याबाबत विजय गिरीधर परदेशी (रा. नेहरु चौक, संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments