Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअहमदनगर जिल्ह्यातील ह्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पावणे सतरा कोटींचे अनुदान

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पावणे सतरा कोटींचे अनुदान

Ahmednagar News : नोव्हेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागात झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची १६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर झाल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिली.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्यासाठी आ. लंके यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. आ. लंके यांच्या या लक्षवेधीची सरकारने दखल घेत हे अनुदान मंजुर केले आहे.

नोहेंबर महिन्यात दोन दिवस झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

२६ नोहेंबर रोजी गारपीट झाल्यानंतर आ. लंके यांनी मोठया प्रमाणावर गारपीट झालेल्या पानोली, वडूले, सांगवी सुर्या, गांजीभोयरे या गावांना भेटी देत शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.

नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. लंके यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याशी चर्चा करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही संपर्क करून गारपीटीने झालेल्या नुकसानीबाबत अवगत केले होते.

गावनिहाय बाधित शेतकरी व मंजुर अनुदान पुढीलप्रमाणे (बाधित शेतकरी संख्या व अनुदान) वडझिरे १८१, (३० लाख १८ हजार ४३०), पिंपरीजलसेन २३३, (४० लाख १३ हजार),

गाडीलगांव १४४, (१७ लाख ६८ हजार ५०, जाधववाडी ८७, (४ लाख ८६ हजार), शिरसुले १९, (२ लाख ३० हजार ८५०), माजमपुर १२५, (१७ लाख ५५ हजार), सांगवी सुर्या ७३३, (१ कोटी ५० लाख ३५ हजार ८५२), पठारवाडी ३६१, ५० लाख १० हजार ३०,

कळस २, ९ हजार ५२०), गटेवाडी १६९, (२२ लाख ५४ हजार ७००), वडनेर हवेली ४६४, (४५ लाख ७८ हजार ३००), म्हसणे १९, (५८ हजार ४८०), जवळा ७११, (२ कोटी १९ लाख ६९ हजार), पारनेर ७८७, ५९ लाख ९३ हजार ९०४, विरोली १३३, (२३ लाख ४ हजार ५५०),

सिध्देश्वरवाडी ४८८, (७१ लाख ३९ हजार ५६०), राळेगणथेरपाळ १३०, (१८ लाख ९० हजार), भांडगांव ६, ६९ हजार ७५०), करंदी ७२, ( ४ लाख ३५ हजार २००),

गांजीभोयरे ८८१, (१ कोटी ५० लाख २५ हजार ५३६), हंगा ३ (१ लाख ८ हजार), राळेगणसिध्दी २७१, (२० लाख २६ लाख १९८), मावळेवाडी ५५, (१० लाख ४० हजार ८३०), वाडेगव्हाण २९, (४ लाख २१ हजार ४९०), वडुले ४१७, (७५ लाख ६८ हजार ५१२), गुणोरे ५५,

(१६ लाख ७५ हजार ५००), घाणेगांव १३५, (४ लाख ५६ हजार ९६०), देवीभोयरे १२७, (१४ लाख ९६ हजार), वडगांव गुंड ३५, (३ लाख १८ हजार ६२०), पानोली १,०५०,

(१ कोटी ८० लाख ५ हजार ७७०), चिंचोली ४५६, (५८ लाख ७७ हजार ९०), शेरीकोलदरा ४४७, (३४ लाख २ हजार), हत्तलखिंडी ५०७, (४७ लाख १८ हजार ९४०), मोरवाडी १९,

(५ लाख ४० हजार), निघोज ६३५, (१ कोटी ४ लाख ३१ हजार), वडनेर बुद्रुक १८, (१ लाख ४३ हजार ५४०), ढवणवाडी ८, (१ लाख २ हजार ६००), पिंपळनेर ५६३, (१ कोटी २८ लाख ७३ हजार ३५६), पुणेवाडी १६७, (२४ लाख ९८ हजार २५०), हकीगतपुर १४५, (९ लाख ४५ हजार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments