अहमदनगर

शिक्षकाने विद्यार्थिनीला केला अश्लील मेसेज; नातेवाईकांनी केली धुलाई

अहमदनगर- अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविल्याने शिक्षकाला नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला.

 

श्रीरामपूर येथील परिसरातील अल्पवयीन मुलीने शाळेय सहलीसाठी फी संदर्भात वर्ग शिक्षकांशी संपर्क साधत असताना नजरचुकीने जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकास मोबाईलवर मेसेज पडला. या शिक्षकाने उलट या मुलीस अश्‍लील मेसज व पुष्प पाठविला. याबाबतचा जाब विचारण्यास गेलेल्या या मुलीच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकास चांगलाच चोप दिला.

 

शाळेची सहल जाणार असल्याने एका विद्यार्थीनीने सहलीच्या फी बाबत मोबाईलवर मेसेज टाकला. तो चुकून दुसर्‍यास शिक्षकास गेला. संबंधित शिक्षकांनी याबाबत अल्पवयीन मुलीस मोबाईलवर विचारणा केली. त्यावेळी मुलीने नजरचुकीने फी संदर्भात मेसेज पडला याबद्दल सॉरी म्हणून सांगितले. त्यानंतर संबंधित शिक्षकाने या मुलीच्या मोबाईलवर अश्‍लील भाषेत मेसेज पाठवून गुलाब पुष्प पाठविले.

 

यामुळे संबंधित अल्पवयीन मुलगी घाबरली. तिने ही माहिती घरातील चुलती व आजी यांना दिली. यानंतर नातेवाईक, शालेय विद्यार्थी मित्रमंडळी यांनी संबंधित शिक्षकास शाळेत येऊन बेदम चोप दिला. यानंतर घटनेची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरली.

 

 

दरम्यान काही नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीसांना कळविली. यानंतर बीट अंमलदार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत संबंधित शिक्षक व अल्पवयीन मुलींचे नातेवाईक यांच्याशी चर्चा केली परंतु मुलगी बाहेरगावी शालेय सहलीसाठी गेल्याने काही माहिती मिळू शकली नाही.

 

यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button