अहमदनगर

जुगार खेळणार्‍या क्लबवर पोलीस महासंचालकांच्या पथकाने छापा घातला

श्रीरामपूर शहरात जुगार खेळणार्‍या क्लबवर पोलीस महासंचालकांच्या पथकाने छापा टाकला. दरम्यान या छाप्यात पोलिसांनी 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

यात 20 जणांना ताब्यात घेण्यात आले होते तर एक जण पसार आहे. यात दिनेश मोहनदास माखिजा, चंद्रकांत गोपीनाथ गुडधे, नसीम मुख्तार शेख, अमरजितसिंग, जावेद खलिद मलिक, रोहिदास अडागळे, सुखदेव गांगुडेर्र्, जाफर करीम शेख, जुनेद असलम मेमन, सलमान हसन कुरेशी, समीर शेळके,जैनुद्दीन याकूब शेख, तुषार नाणेकर, राजेश गोसावी,अजमल नासिर शेख, सर्फराज बाबा शेख, अकील शेख, अमजद पठाण यासह अन्य 21 जण तिरट नावाचा जुगार खेळत असताना पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, टाळूयासह श्रीरामपूर शहरात जुगार, मटका, तसेच अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पोलीस महासंचालकांच्या पथकाने दोन तीन ठिकाणी छापे टाकले. यात तिरट नावाचा पत्याचा जुगार पैसे लावून खेळत असताना पकडले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 45780 रुपये रोख रक्कम, 63 हजारांचे 15 मोबाईल, 1 लाख 55 हजारांच्या पाच मोटारसायकल असा एकूण 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button