अहमदनगरताज्या बातम्यासंगमनेर

डोक्यात फरशीचे घाव घालून तरुणाचा खून

तरुणाच्या डोक्यात फरशीने घाव घालत त्याचा खून करण्यात आला होता. मृताचे नाव शाहरूख उस्मान शहा (वय २८, बीफमार्केट, श्रीरामपूर) असे आहे.

शहरातील संगमनेर रस्त्यावर एका हॉटेलनजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.

तरुणाच्या डोक्यात फरशीने घाव घालत त्याचा खून करण्यात आला होता. मृताचे नाव शाहरूख उस्मान शहा (वय २८, बीफमार्केट, श्रीरामपूर) असे आहे.

संगमनेर रस्त्यावर तो काही ओळखीच्या लोकांसमवेत बसलेला होता. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून त्याच्या डोक्यात घाव घालण्यात आला.

Advertisement

शहरातील साखर कामगार रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले होते. पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे तसेच पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघा संशयितांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी शाहरूख याच्या ओळखीचे आहेत.

मृत शाहरूख याच्यावर मालमत्तेची चोरी तसेच हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर अटकेतील दोघे आरोपीही अशाच स्वरुपाच्या गुन्ह्यात सहभागी होते.

Advertisement

सर्वजण एकमेकांचे परिचित आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी ‘लोकमत’ला दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button