अहमदनगर

आजारी आईला भेटण्यासाठी निघालेल्या युवकास मारहाण

आजारी असलेल्या आईला जिल्हा शासकीय रूग्णालयात भेटण्यासाठी जात असलेल्या युवकाला दोघांनी गाठून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली.

जिल्हा शासकीय रूग्णालयाजवळ ही घटना घडली. सलमान बशीरखान पठाण (वय 23 रा. अमीरमळा, नगर-औरंगाबाद रोड) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.

जखमी पठाण याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आसीफ आयुब पठाण व त्याच्या सोबतचा अनोळखी व्यक्ती (रा. अकबरनगर, अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान पठाण यांच्या आईवर जिल्हा रूग्णालय येथे उपचार सुरू असल्याने ते जिल्हा रूग्णालयाकडे जात असताना पाठीमागून आलेल्या आसीफ व त्याच्या सोबतच्या एक अनोळखी व्यक्तीने सलमानला पकडले.

मागील भांडणाच्या कारणातून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक सलिम शेख करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button