Ahmednagar Crime : येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण

Ahmednagar Crime :अरणगाव (ता. नगर) येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 एप्रिल रोजी संतोष ज्ञानेश्वर डव्हारे (वय 17 रा. शिंदेवाडी, अरणगाव) हा सकाळी साडेआठ वाजता कोणाला न सांगता घराबाहेर पडला. संध्याकाळी उशीरा पर्यंत तो घरात पुन्हा आला नाही.
नातेवाईक व गाव परिसरात विचारपूस केल्यानंतरही त्याचा शोध लागला नाही. त्याचे वडिल ज्ञानेश्वर डव्हारे यांच्या फिर्यादीवरुन 11 एप्रिल रोजी मुलाला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष डव्हारे सडपातळ बांध्याचा निमगोरा व त्याची उंची 165 सेमी आहे. त्याने घराबाहेर पडताना ग्रे कलरचा ट्रॅकसुट घातलेला आहे. सदर मुलगा कोणाला सापडल्यास त्यांनी पोलीसांशी अथवा मो.नं. 7038219005 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.