अहमदनगर

जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अभिजीत लुणिया यांची निवड..

अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अभिजीत लुणिया यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे पाटील यांच्या सूचनेनुसार अभिजित लुणिया यांची नियुक्ती करण्यात आली.

अभिजीत लुणिया हे पूर्वीपासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय पदाधिकारी असून एन एस यु आय व युवक काँग्रेसचे ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते तर इंटकच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती.

नामदार बाळासाहेब थोरात व सत्यजीत तांबे यांचे ते अत्यंत निष्ठावान असून सत्यजीत तांबे यांच्या जिल्हा परिषद, युवक काँग्रेस तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांचा अत्यंत सक्रिय सहभाग होता .

त्यांच्या नियुक्तीबद्दल नामदार बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे ,आमदार लहू कानडे ,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, प्रदेश सचिव दीप चव्हाण, सचिन गुंजाळ,

उत्कर्षा रुपवते, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, तात्यासाहेब ढेरे, करण ससाणे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, एस सी विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, राहुल उगले, सुभाष सांगळे, सेवादल जिल्हाध्यक्ष सुरेशराव झावरे, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button