अहमदनगर

दरोडा टाकून 13 वर्षे फरार राहिले; शेवटी पोलिसांनी दोघांना जेरबंद केलेच

अहमदनगर- अपहरणासह दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये 13 वर्षांपासून फरार असलेल्या राहुल रोहील कौर (रा. इंदिरा कॉलनी, पंजाबी हॉटेलमागे, तारकपूर) आणि प्रशांत यादव वाघमारे (रा. कौलारू झोपडपट्टी, सर्जेपुरा) या दोन आरोपींना एलसीबी पथकाने राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

 

नगरमध्ये सन 2008 अपहरण करून दरोडा टाकल्याची घटना घडली होती. तसा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी कौर आणि वाघमारे हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होते. त्यांच्याविरूध्द न्यायालयाने अजामीन पात्र वारंट काढले होते.

 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोन्ही आरोपींना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा शोधून या दोघांना शहरातील वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button