अहमदनगर

महिला वकिलास अश्‍लील मेसेज करत गैरवर्तन

महिला वकिलास अश्लील मेसेज करून रस्त्याने जात असताना त्यांच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अभिनंदन दिलीप वाळके आणि स्वप्ना दिलीप वाळके (रा. अभय टॉवर, जुने कोर्ट शेजारी, अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

32 वर्षीय पिडीत महिला वकिलाने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपींनी मोबाईलद्वारे अश्लील मेसेज पाठवून पीडीतेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

या संदर्भात पीडिता विचारणा करण्यासाठी जात असताना स्वप्ना वाळके याने पीडितेला रस्त्यात अडवून,‘तू अभिनंदनचा नाद सोड आणि केस मागे घे’, असे म्हणत दमदाटी केली.

त्याचदरम्यान अभिनंदन त्याठिकाणी आला असता त्याने पीडितेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत धमकी दिली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button